पिंपरी (Pclive7.com):- प्लास्टिक बंदी विरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात कडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव येथील डांगे चौक परिसरात पथकाकडून आज (दि.२५) कारवाई करण्यात आली. या कारवाईत परमिटरूम आणि वाईन्स शॉपकडून १० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २४ डांगे चौक परिसरातील १४ दुकानांची तपासणी पथकाकडून करण्यात आली.
या कारवाईत दोन परमिट रूम आणि वाईन शॉप मध्ये सर्रासपणे प्लास्टिकचे ग्लास वापरत असल्याने आढळून आले. त्यामुळे त्या दोन्ही शॉपला प्रत्येकी ५ हजार रुपये शासकीय दंड ठोठावण्यात आला. या दोन्ही शॉपकडून एकूण १० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त तथा ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके यांच्या नेतृत्वात सहाय्यक आरोग्य अधिकारी अजय जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद, वसंत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच ही कारवाई प्रभाग क्रमांक २४ चे आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, आरोग्य सहाय्यक संतोष ओव्हाळ व कर्मचारी प्रशांत पवार, अभय दारोळे, अनिल डोंगरे, अमन वाल्मिकी यांच्या मार्फत करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group