पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील जगताप डेअरी साई चौक येथील ग्रेड सेपरेटरचे काम लवकर पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
नाना काटे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथे नाशिक फाटा ते हिंजवडी या बीआरटीएस मार्गावर पिंपळे सौदागर व वाकडला जोडणार्या ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. या ग्रेट सेपरेटरचा एक मार्ग काही दिवसापूर्वी खुला करण्यात आला आहे. तर दुसऱ्या मार्गाचे काम सुरु असून ते खूप संथ गतीने सुरू आहे.
या मार्गावर वाहनाची खूप वर्दळ असते. सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने तसेच बहुतेक आयटी पार्क बंद असल्याने वर्दळ कमी आहे. ही बाब विचारात घेता पिंपळे सौदागर जगताप डेअरी साई चौक येथील ग्रेड सेपरेटरचे संथ गतीने सुरु असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित काँन्ट्रॅक्टर व अधिकारी यांना सूचना द्याव्यात. तसेच हा ग्रेड सेपरेटर नागरिकांसाठी लवकर खुला करण्यात यावा अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group