पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) हे शहरवासियांसाठी वरदान ठरले आहे. या काळात ४६ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले की, कोरोना काळात महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयास शहराबरोबरच राज्यातील रुग्णांची पसंती होती. येथे सर्वात चांगला उपचार दिला जात असल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुण्याबाहेरूनही रुग्ण दाखल होत होते. रुग्णालयात ४६ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यात १६५० जणांचा मृत्यू झाला असला तरी हा मृत्युदर अतिशय कमी होता.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एक हजारापेक्षा जास्त गरोदर माता तसेच ३०० बालकांना सेवा देण्यात आली आहे. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा रुग्णालयात दिली गेली. त्यामुळे मृत्युदर अतिशय कमी राखण्यात यश आले. तसेच, रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक होता, अशी माहिती डॉ. राजेश वाबळे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group