भोसरी (Pclive7.com):- आल्हाट दांम्पत्यास गेली १०-१५ वर्षापासून मी ओळखतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रूपाली आल्हाट या सेनेच्या उमेदवार होत्या. त्यांना अवघ्या ४७ मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्या पराभवाला न डगमगता निकालाच्या दुसऱ्याच दिवशी हे दांम्पत्य नागरिकांच्या सेवेस रूजु झाले. या निवडणुकीत रूपालीताई परशुराम आल्हाट यांना निवडून द्या. त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी राहिल असा आश्वासन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दिले.
मोशी परिसरातील जेष्ठ नागरिक संघ व मोशी परिसरातील जेष्ठ नागरीक यांच्यासाठी तीर्थक्षेत्र ओझर येथे गणपती बाप्पाचे दर्शन रूपालीताई परशुराम आल्हाट यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी २०० हून अधिक जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर जेष्ठ नागरिकांचा सन्मान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, मी गेली १०-१५ वर्षापासून या आल्हाट दांम्पत्यास ओळखतो आहे. मागिल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रूपाली आल्हाट शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांना त्या निवडणुकीत अवघ्या ४७ मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्या पराभवाला न डगमगता निकालाच्या दुसऱ्याच दिवशी हे दांम्पत्य नागरिकांच्या सेवेस रूजु झाले. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता दरमहा २१०० कुटुंबाला स्व:खर्चाने किराणा साहित्याचे वाटप हे दांम्पत्य करत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण सौ.रूपाली किंवा श्री.परशुराम आल्हाट या दोघांपैकी एकाला विजयी कौल द्या. त्यानंतर त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. अश्याप्रकारे विधान करून शिवसेना नेते आढळराव पाटील यांनी सौ. किंवा श्री.आल्हाट यांची उमेदवारी नकळत पणे जाहीर केली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुक येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
महाविकास आघाडी होईल का नाही हे माहीत नाही. परंतु आढळराव पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रथम श्री.व सौ.आल्हाट यांची उमेदवारी जाहीर करून आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बानखिले, शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख अरून गिरे, जेष्ठ नागरीक संघ मोशीचे अध्यक्ष मनोहर वेलनकर, देशमुख काका, चौधरी काका, कुलकर्णी आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group