पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरच्या सौंदर्यात भर टाकणारे राजमाता जिजाऊ उद्यान डिसेंबर अखेरपर्यंत नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज (दि.२७) पीसी लाईव्ह न्यूजला दिली.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज राजमाता जिजाऊ उद्यान येथील कामाची पाहणी केली. पिंपळे सौदागरमधील जेष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि लहान मुले यांना केंद्रबिंदू ठेवत हे उद्यान उभारण्यात येत आहे.
यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या उद्यानाचा आनंद नागरिकांना घेता यावा यासाठी तातडीने संबधित अधिकारी यांच्याशी चर्चा करुन काम पूर्ण करण्याच्या व कामाचा उत्तम दर्जा ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना शत्रुघ्न काटे यांनी केल्या.






















Join Our Whatsapp Group