पिंपरी (Pclive7.com):- कोरोना, अन्य कारणाने मृत्यू झालेल्या मिळकतधारकांचे वारस म्हणून असणाऱ्या विधवांच्या नावे मिळकत हस्तांतरासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुढाकार घेतला आहे. दिनांक २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरला ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरातील १६ कर संकलन विभागीय कार्यालयात शिबिर होणार आहे. महापालिकेचे करसंकलन विभागाचे दप्तरी नोंद असलेल्या मिळकतीचे मालक म्हणून विधवा पत्नी व त्यांचे पती यांचे नाव असेल अथवा विधवा पत्नी यांचे फक्त पतीचे नाव असेल अशा मिळकतींचे, प्रकरणी शिबिर कालावधीत मिळकत हस्तांतर नोटीस बजाविण्यात येणार आहे.
मिळकत हस्तांतर करण्याकरिता मिळकत कराचे बिल, पतीचा मृत्यू दाखला, पती व पत्नीचे आधार कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच मिळकत हस्तांतर फी भरणा करणे आवश्यक आहे.
मिळकत कर विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, ज्या मिळकतधारकांना प्रादुर्भावामुळे मिळकत कराची थकबाकी भरणा करणे शक्य होत नाही, अशा विधवा मिळकतधारकांकडून भविष्यात मिळकत कर भरणा केला जाईल.























Join Our Whatsapp Group