पिंपरी (Pclive7.com):- कॉंग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. भारतीय स्वातंत्र लढ्यात काँग्रेस पक्षाचे योगदान आणि कॉंग्रेसच्या विचाराने भारावून गेलेल्या कार्यकर्त्यांचे बलिदान देशातील नागरीक कधीही विसरू शकत नाही. आज भारताची औद्योगिक क्षेत्रातील प्रगती हि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या पर्यंतच्या कॉंग्रेसच्या पंतप्रधानांमुळे आहे. कॉंग्रेसच्या औद्योगिक धोरणांमुळेच महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक अग्रेसर क्षेत्रात आहे. पिंपरी चिंचवड मध्ये देशभरातून युवक, रोजगारासाठी येतात. त्यांच्या कलागुणांना, क्रीडा गुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शहर कॉंग्रेसने कॉंग्रेसच्या राष्ट्रीय वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वर्धापदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. 28 डिसेंबर) सायंकाळी संत तुकाराम नगर पिंपरी येथे चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम बोलत होते. यावेळी उपस्थित कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच डॉ. कैलास कदम आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते ज्येष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेविका निर्मला कदम, माजी नगरसेवक माऊली थोरात, मारुती भापकर, सद्गुरु कदम, विश्वास गजरमल, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर कांबळे, मानव कांबळे, संदीपान झोंबाडे, बाबा कांबळे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, सेवा दल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, ज्येष्ठ नागरीक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर,
भाऊसाहेब मुगूटमल, अबुबक्र लांडगे, प्रकाश जवळकर, तारीक रिझवी, अनिल रोहम, प्रविण माने, राजाराम भोंडवे, संभाजी मुळीक, हरीश डोळस, पांडूरंग जगताप, सुनिल राऊत, विश्वास जगताप, इरफान शेख, याकूब इनामदार, महिला नेत्या छायाताई देसले, प्रतिभा कांबळे, नंदाताई तुळसे, शोभा पगारे, सायली नढे, सिमाताई बिबवे, उषा साळवी, हेमा रमाणी, आशा भोसले, स्वाती शिंदे, वैशाली गोडसे, प्रतिभा खोत, किरण नढे, के. हरी नारायणन, बाबा बनसोडे, स्वप्निल बनसोडे,
विजय ओव्हाळ, हिराचंद जाधव, उमेश बनसोडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, जनार्धन पोलकडे, एकनाथ मुंडे, गौतम ओव्हाळ, विजय ओव्हाळ, सौरभ शिंदे, आबा खराडे, सतिश भोसले, विश्वनाथ खंडाळे, मिलिंद बनसोडे, धनाजी येळकर पाटील, मेहबूब शेख, बाळासाहेब जगताप, किरण नढे, इस्माईल संगम, मोहसीन खान, तेजराव गवई, बसवराज शेट्टी, प्रदिप पवार, नयन पालांडे, रवी नांगरे, विश्वनाथ जगताप, शाम भोसले आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group