पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात विविध विकास कामाच्या माध्यमातून ठीकठिकाणी खोदाई करण्यात येते आहे. चिंचवड गावातील लहान-मोठ्या रस्त्यावरतीही अशाच पद्धतीने खोदकामे करण्यात आली आहे. सिमेंटचे रस्ते बनवण्यासाठी चिंचवड गावातील बहुतांश पेठा खोदल्या आहेत. त्यामुळे मागील तीन वर्षापासून चिंचवड गावातील नागरिक खड्डेमय वातावरणात रहात असल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत.
पिंपरी महानगरपालिकेकडून चिंचवड गावात सिमेंटचे रस्ते विकसित करण्याचे काम सुरू आहे. चिंचवड गावात अनेक लहान मोठे रस्ते खोदले असल्यामुळे लोकांना दळणवळणासाठी खूप कसरत करावी लागत आहे. एकेक रस्ते तयार करून नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली जात नाही. सरसकट रस्ते खोदल्याने पाणीपुरवठा, ड्रनेज याचे पाणी रस्त्यावर वाहताना दिसत असल्याने काही प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. तर स्वत:ची वाहने घरापर्यंत येत नसल्याने बेवारस स्थितीत वाहने पार्किंग करावी लागतात. तर काही लहान-मोठ्या व्यवसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.





















Join Our Whatsapp Group