पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण महारष्ट्रातील शेकऱ्यांच्या आवडीचा ग्रामीण खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. या बैलगाडा शर्यतीवरील बंदी मा. न्यायालयाने नुकतीच उठवली आहे, परंतु गेली सात वर्ष या शर्यती बंद होत्या. त्यामुळे शहरातील बैलगाडा घाटांची दुरवस्था झाली होती. हे बैलगाडा घाट शर्यत घेण्या योग्य नाहीत.
ग्रामीण भागामध्ये चऱ्होली, तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, भोसरी या ठिकाणच्या बैलगाडा घाटाना विशेष महत्व आहे, म्हणून माजी महापौर राहुल जाधव यांनी उपसुचनेद्वारे महासभे पुढे घाट दुरुस्तीची मागणी केली होती.
नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी उपसुचनेला अनुमोदन दिले आणी पिंपरी चिंचवड शहरातील बैलगाडा घाटांच्या दुरुस्ती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या दि.२० रोजी महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.
भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर राहुल जाधव यांच्या मागणीला यश आले. लवकरच या बैलगाडा घाटांच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम चालु होईल.






















Join Our Whatsapp Group