
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुरूष आणि महिलांच्या गटात अनुक्रमे सह्याद्री किंग्ज् आणि शेट्टी बन्ट् वॉरीयर्स या संघांनी विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण मावळचे खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी सचिव रियाझ बागवान, अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, सहसचिव दिलीप मोहीत, खजिनदार संजय शिंदे यांच्या हस्ते पार पाडला. यावेळी स्पर्धेतील सहभागी संघाचे मालक उपस्थित होते. पुरूष गटातील विजेत्या सह्याद्री किंग्ज् संघाला दिड लाख रूपये आणि करंडक तर उपविजेत्या संघाला सोनिग्रा सुपरकिंग्जला एक लाख रूपये आणि करंडक असे पारितोषिक देण्यात आले. महिला गटातील विजेत्या शेट्टी बन्ट् वॉरीयर्स ७५ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या नायर ईगल्स् संघाला ५० हजार रूपये आणि करंडक पारितोषिक देण्यात आले.

यावेळी शहरातील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. १९ वर्षाखालील महाराष्ट्राची कर्णधार ईश्वरी अवसरे, इशा घुले, ऋतुजा गिलबिले, सहेज कौर, श्रेया जगदाळे, श्रेया तरस, नीती अगरवाल, इंद्रजीत शिंदे, अभिनव देसाई, प्रज्वल पवार, वेदांत कानपिळे, चैतन्य कोंडभार आदि खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा जगदीश शेट्टी, राजू कोतवाल, वसंतभाऊ कोकणे, संजय शिंदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली व त्यांना विजय कोतवाल, प्रशांत तेलंगे, सुशील जाधव, अरुण जागडे, आनंद नायडू, मुकेश गुजराती यांचे सहकार्य लाभले.
अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः पुरूष गटः
सह्याद्री किंग्ज्ः २० षटकात ९ गडी बाद १७८ धावा (मयुर गोखले ६९ (३७, ५ चौकार, ५ षटकार), परेश कोठारी २७, संकेत माने ३-२९, मेधांश शिंदे २-३८) वि.वि. सोनिग्रा सुपरकिंग्जः २० षटकात ८ गडी बाद १३४ धावा (प्रसन्ना मोरे ४४, संकेत माने ३३, अनिश गायकवाड २-५, लोकेश चौधरी २-१८, अभिषेक राय २-३५); सामनावीरः मयुर गोखले;
वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः सुशांत अभंग;
सर्वोत्कृष्ट फलंदाजः तिलक जाधव;
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः अभिषेक राय;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः पारस चव्हाण;
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः अजित गव्हाणे;
तृतीय क्रमांकाचे पारितोषिकः प्रतिक रॉयल्स् (करंडक आणि ७५ हजार रूपये);
शिस्तबद्ध संघः विश्व टायगर्स;
महिला गटः नायर ईगल्स्ः २० षटकात ३ गडी बाद १५९ धावा (मानसी तिवारी नाबाद ४९, इशा घुले ७३ (३७, ११ चौकार, १ षटकार), वैभवी यादव १-१४); (भागिदारीः तिसऱ्या गड्यासाठी इशा आणि मानसी यांच्यात ९७ (६५); पराभूत वि. शेट्टी बन्ट् वॉरीयर्सः १९.४ षटकात ४ गडी बाद १६० धावा (अमानी नदाल ७३ (५३, ९ चौकार, १ षटकार), आर्या चिखलीकर ३०, अर्णवी शिंदे नाबाद २६, ऋतुजा गिलबिले २१, अनघा आहेर १-१७); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः अमानी नदाल;
वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः इशा घुले;
सर्वोत्कृष्ट फलंदाजः अमानी नदाल;
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः वेदीका थोरात;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः सृष्टी सुर्यवंशी;
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः मिनल पाटील;
तृतीय क्रमांकाचे पारितोषिकः ऐश्वर्यम चॅलेंजर्स (करंडक आणि २५ हजार रूपये);
शिस्तबद्ध संघः ऑक्सिरिच;




















Join Our Whatsapp Group