पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिदिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. बी. चांडक यांना प्रदान करून त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, उपमहापौर शैलजा बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका स्वाती (माई) काटे, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष चेतन पवार, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तसेच माजी नगरसेवक अरुणभाऊ बोऱ्हाडे, फजलभाई शेख, दत्तात्रय वाघेरे, हनुमंत नेवाळे, नरहरी कापसे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब (आप्पा) वाघेरे, नानिक पंजाबी, गणेश ढाकणे, उद्योजक गणेश कुदळे, उषाताई वाघेरे, अनिता वाळुंजकर, शोभा मुंढे, कन्या विद्यालयाच्या प्राचार्य परदेशी मॅडम, दत्तात्रय मासुळकर, डॉ. पांडुरंग भोसले, अजय जयसिंग कापरे, पवना सहकारी बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे व बिपीनशेठ नाणेकर, उद्योजक विजय काटे, दिलीप देवकर, यशवंत साखरे, काळूराम लांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनसेवेतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांनी घ्यावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




















Join Our Whatsapp Group