या कारवाईत २ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पाच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे यांच्या पथकाने ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:११ वाजण्याच्या सुमारास भुजबळ वस्ती, वाकड येथील भामा सेंटरमधील शॉप नंबर १०१ वर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी स्पा चालक मारुती ज्ञानेश्वर मुरडे (वय ४८, रा. देवगिरी अपार्टमेंट, पुणे) आणि स्पा मॅनेजर वैशाली संतोष चव्हाण (वय ३१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, महिला मॅनेजरला अटक केली आहे. चालू वर्षातील धडक कारवाईची आकडेवारीपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने अवैध वेश्याव्यवसायाविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे.

पोलीस प्रशासनाचा कडक इशारा..
“मागील ३ वर्षांत अशी एकूण ३० आस्थापने १ वर्षासाठी बंद करण्यात आली आहेत. सार्वजनिक आणि रहिवासी भागात स्पा किंवा हॉटेलच्या नावाखाली असे अवैध धंदे चालवणाऱ्या इतरही अनेक आस्थापनांची चौकशी सध्या सुरू असून, त्यांच्यावरही लवकरच अशीच कठोर कारवाई केली जाईल.” सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त रोहिदास पवार, डॉ. शिवाजी पवार, आणि एसीपी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयू (AHTU) पथकातील अंमलदार सुनील शिरसाट, संतोष म्हस्के, विवेक गायकवाड, गणेश कारोटे, श्रद्धा भरगुडे, वैष्णवी गावडे व इतर सहकाऱ्यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group