प्रभाग क्र.१२ – घरकुल, शरदनगर, हरगुडेवस्ती, नेवाळेवस्ती, भीमशक्तीनगर मधील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्यकर्त्या किर्तीताई जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक उपक्रम म्हणून ‘किर्तीताई जाधव युवा मंच’ यांच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. २० फेब्रुवारी २२ रोजी डी-लाईन बिल्डींग समोरील क्रीडांगण, घरकुल, चिखली येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा महोत्सव आयोजित केला आहे. जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन सौ.किर्ती मारुती जाधव यांनी केले आहे.

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक तरुण बेरोजगार झाले. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे अनेक कामगार स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांना मनुष्यबळाची गरज आहे. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात तसेच कंपन्यांना मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी हा नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये पाचवी ते उच्च शिक्षण झालेल्या युवक युवतींसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देत आहोत.

यामध्ये हाऊसकीपिंग, आयटीआय, बीपीओ, केपीओ, उत्पादन क्षेत्र, हॉटेल, केमिकल, हार्डवेअर, खाद्य उद्योग या सोबतच अभियंता क्षेत्रातील पदविका तसेच पदवीधर, एमबीए सारख्या उच्च शिक्षित मुलांना तसेच अकुशल कामगारांना ही नोकरीची संधी येथे उपलब्ध होणार आहे. इच्छुकांनी प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करून नोकरी महोत्सवातील आपला सहभाग निश्चित करावा असे किर्ती मारुती जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
तसेच दिनांक १५ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत युनिवर्सल पास, स्मार्ट आधार कार्ड, स्मार्ट पॅन कार्ड, स्मार्ट उद्योग कार्ड, स्मार्ट ई-श्रम कार्ड व स्मार्ट मतदान कार्ड बिलकुल मोफत काढून देण्यात येत आहे. तरी प्रभाग क्रं.१२ मधील घरकुल, शरदनगर, हरगुडेवस्ती, नेवाळे वस्ती, भीमशक्तीनगर मधील नागरिकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9503093322 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags: latest marathi newsकिर्तीताई जाधवघरकुलनेवाळेवस्तीनोकरी महोत्सवप्रभाग क्र.१२मोफत स्मार्ट कार्ड शिबीर






















Join Our Whatsapp Group