पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपुष्ठात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी यासंदर्भातील आदेश आज (दि.०३) रोजी दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने माहे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहित वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३U तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ६,६(अ) मधील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषतः कलम ४५२अ च्या (१अ) व (१ब) मधील तरतुदीनुसार दि.१३.०३.२०२२ रोजी मुदत संपत असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे प्रशासक पदी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आदेशात म्हटले आहे.
Tags: latest marathi newsPCLIVE7.COMPCMCPcmc newsपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महापालिकाप्रशासकराजेश पाटील






















Join Our Whatsapp Group