पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांच्या वतीने महिलांसाठी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी आपले विचार मांडले. यावेळी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

जागतिक महिला दिन (International Women’s Day) दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. याचे औचित्य साधून शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांच्या वतीने गणेश नगर, तळवडे येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी स्त्री शक्ती-राष्ट्र शक्ती या विषयावर प्रा.गणेश शिंदे म्हणाले, आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. स्त्रीला आई, बहीण, मुलगी, पत्नी, मैत्रीण, मावशी,आजी इत्यादी अनेक नाती हळुवार जोपासावी लागतात.स्त्री ही सृष्टीचे जीवन चक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते आहे. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही.
आजच्या स्थितीला स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे गावच्या सरपंचपदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. जिवनात येणाऱ्या कटाचा जिद्दीने सामना करा,असे शिंदे म्हणाले. यावेळी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुधाकर दळवी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पतंगे काका, विलास भालेकर, विजय थेटे, श्रीपत मालुसरे,राजू खटावकर, रमेश शिंदे, रमेश कुमार परमार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन वसंत सावंत यांनी केले.






















Join Our Whatsapp Group