पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका १३ मार्चला बरखास्त झाल्याने पदाधिकाऱ्यांकडे असलेले मुख्य लिपीक, लिपीक व शिपाई असे एकूण ६० कर्मचारी रिक्त झाले आहेत. दहा दिवस उलटूनही त्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत.

फेब्रुवारी २०१७ च्या पंचवार्षिकेची मुदत १३ मार्च २०२२ ला संपली. त्यामुळे महापौर, उपमहापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विविध विषय समितीचे सभापती व इतर पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे त्यांची महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावरील दालनांना टाळे लावण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या दालनात मुख्य लिपीक, स्वीय सहायक, लिपीक आणि शिपाई असे एकूण ६० कर्मचारी काम करीत होते. ते सर्व कर्मचारी सोमवारपासून (दि.१४) बिनकामाचे झाले आहेत. त्यांची इतर विभागात बदली न केल्याने त्यांना काम राहिलेले नाही.
या संदर्भात प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले की, नगरसचिव विभागाकडून त्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेतली आहे. काही कर्मचारी नगरसचिव व पाणीपुरवठा विभागात नेमले जाणार आहेत. उर्वरित कर्मचारी आवश्यकतेनुसार त्या विभागात नियुक्त केले जाणार आहेत. आयुक्तांच्या मान्यतेने ती प्रक्रिया सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group