पिंपरी (Pclive7.com):- मोशी-चिखली येथे आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेतील गोल्डन पाल्म सोसायटी विरुद्धच्या लढतीत ऐश्वर्यम हमारा सोसायटीने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत परिसरातील एकूण १०२ क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी मोशी-चिखली परिसरातील सोसायटीधारकांसाठी सोसायटी प्रीमियर लीग फुलपीच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, मंगल जाधव, सोनम जांभुळकर, सागर हिंगणे, संतोष बारणे, मंगेश हिंगणे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे यांनी स्पर्धेच्या आयोजनात पुढाकार घेतला.
अंतिम सामन्यात पाल्म सोसायटी आणि ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये रंगतदार लढत झाली. यामध्ये ऐश्वर्यम हमारा सोसायटीने विजय मिळवला. गोल्ड पाल्मला उपविजेतेपद, तर डॉक्टर्स टीम वुड्स विले फेज-२ सोसायटीने तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. अंतिम सामना पाहण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे बंधु उद्योजक कार्तिक लांडगे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, हिरामन आल्हाट, महेंद्र बोराटे, अतुल बोराटे, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.
परिसरातील सोसायटींच्या सहभागामुळे अतिशय शिस्तबद्ध व नियोजन करून ही स्पर्धा पार पडली. गेले ८ दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. अतिशय चुरशीची झालेली फायनल स्पर्धा पाण्यासाठी सुमारे ५ हजार लोकांनी क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती दर्शवली.
आकर्षक बक्षिसांची धुलवड…
सोसायटी प्रीमियर लीग आमदार चषक-२०२२ स्पर्धेकरिता आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली. पहिल्या क्रमांसाठीसाठी ५१ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार रोख, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रोख, चतुर्थ क्रमांसाठी ११ हजार रोख, पाचव्या क्रमांसाठी ७ हजार रोख, सहाव्या क्रमांसाठी ५ हजार रुपये रोख अशी प्रमुख बक्षीसे देण्यात आली. यासह सलग तीन विकेट, सलग तीन चौकार, सलग तीन षटकार, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज अशा गुणवंत खेळाडुंनाही रोख स्वरुपात बक्षीसे देण्यात आली.