पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी परिसरातील विविध प्रलंबित कामे मार्गी लावावीत अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी केली आहे. महापालिकेचे सह शहर अभियंता तथा ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय निगडी प्राधिकरणचे मुख्य समन्वय अधिकारी श्रीकांत सवणे यांना सय्यद यांनी निवेदन दिले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. आकुर्डी परिसरात विद्युत, स्थापत्य, ड्रेनेजची विषयक विविध कामे प्रलंबित असून सदर कामे मार्गी लाववीत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी इखलास सय्यद यांच्याकडे केली आहे. त्यानुसार सय्यद यांनी महापालिका प्रशासनाकडे त्याबाबतचा पाठपुरावा सुरू केला आहे.
आकुर्डी परिसरातील विविध समस्या खालील प्रमाणे
१) ट्रीनिटी शाळेजवळ खड्डा पडला असून त्याठिकाणी पेविंग ब्लॉक्स रिफिक्सिंग करावे.
२) इंद्रप्रस्त सोसायटी क्रांतीनगर येथे सार्वजनिक जागेत पेविंग ब्लॉक्स खचले असून पादचाऱ्यांना येता जाता त्रास होत आहे.
३) विवेकनगर येथे जैन स्थानक येथे रस्त्याच्या बाजूला ३ आठवडे झाले खोदून ठेवले असून अद्यापही ब्लॉक्स बसवले नाहीत. तसेच जैन स्थानक समोर मनोज जैन यांच्या बंगल्या शेजारी पावसाचे पाणी जाण्याकरिता पाईप टाकली आहे ती चुकीच्या पद्धतीने टाकली असून पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पाणी आत बंगळ्यामध्ये शिरत आहे त्याची दुरूस्ती करावी.
४) आकुर्डी मेन रोडवर सिमेंट क्रॉंक्रिटिकरणाचे काम सुरू असून भालेराव हॉस्पिटल समोर एक लाईन झाली नसून १० फूट खड्डा सुमारे ६ महिन्यापासून तसाच आहे.
५) श्री विठ्ठल मंदिर बाजूला विठ्ठल हेरिटेज जवळ ड्रेनेज लाईन दुरुस्त करून ५ महिने झाले अद्याप पेविंग ब्लॉक्स रिफिक्सिंग केलेले नाहीत भाविकांची गैरसोय होत आहे.
६)अमृत योजने अंतर्गत नाल्यामधील ड्रेनेज लाईन बदलली असून सदर काम झाल्यानंतर नाल्या शेजारी असणाऱ्या जयश्री अपार्टमेंट मध्ये पावसाळ्यात पाणी जाण्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत सोसायटीने अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे.
७) ज्ञानेश्वर कॉलनी मध्ये २ महिन्यांपूर्वी पिण्याच्या पाण्याची लाईन टाकल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती अद्याप झाली नाहीये परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
८) मनपाच्या उर्दू शाळेसमोर कदम चाळीत नवीन ड्रेनेज लाईन टाकावी.
९) भालेराव हाईट्स ते अरुण आरकेड या रस्त्यावर अमृत योजने अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती. सदर लाईनचा पॅच खचला असून तातडीने दुरुस्त करावा.
१०) दत्तवाडी मेन रोडवर संजीवनी मेडिकल समोर चाळीत कोबा करणे आवश्यक आहे.
११) साई दर्शननगर येथे साहेबराव काळभोर बिल्डिंग मागे गटर असून मोठ्या प्रमाणात खराब झाले असून पावसाळ्यापूर्वी गटर तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे.
१२) मारुती कॉम्प्लेक्स शेजारी दत्त कुटे यांच्या घर शेजारी कोबा करण्यात आला होता. मात्र ते काम अर्धवट अवस्थेत सोडले असून त्या ठिकाणी कोबा करणे गरजेचे आहे.
१३) आकुर्डी गुरुदेव नगर येथे बंडेवार बिल्डिंग जवळ पेविंग ब्लॉक्स खचले असून त्या ठिकाणी नवीन ब्लॉक्स बसवणे गरजेचे आहे.
१४) गुरुदेव नगर येथे कुंभार गल्लीत पेविंग ब्लॉक खचले असून त्या ठिकाणी नवीन ब्लॉक बसवणे गरजेचे आहे.
१५) गुरुदेव नगर येथे कुंभार गल्लीत जलनिःसारण नलिकेचे चेम्बर खचले असून खड्डा पडला आहे. सदर चेम्बर तातडीने दुरुस्त करण गरजेचे आहे.
१६) सूर्यवंशी चौक विठ्ठलवाडी येथे श्री सोनार काका यांचे जवळ रात्री खुप अंधार असतो. त्यामुळे त्या ठिकाणी विजेचा खांब बसवणे.
१७) एन बी आर्केड येथे रात्री खूप अंधार असल्याने त्या ठिकाणी नवीन विजेचा खांब बसवणे.
अशा प्रकारच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी इखलास सय्यद यांनी प्रशासनाकडे केली आहे.





















Join Our Whatsapp Group