पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.१९ जुलै) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामाजिक उपक्रम संभाजीनगर येथील नोवेल स्कूल, नोवेल चौक येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : नोवेल स्कूल, नोवेल चौक, संभाजीनगर, चिंचवड
दिनांक : रविवार, दि. १९ जुलै
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५.
आयोजक : आमदार अमित गोरखे, पिंपरी विधानसभा मतदारसंघ.





















Join Our Whatsapp Group