पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी पथकाच्या मदतीने मोठी कारवाई करत ६ किलो ९९४ ग्रॅम अफू व डोडा चुरा (पॉपी स्ट्रॉ) जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ६ लाख ६८ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास माण-हिंजवडी मार्गावरील अंबिका हार्डवेअर दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली. आरोपी पप्पुराम भारमल चौधरी (वय ४३, रा. भरणेचाळ, माणगाव, हिंजवडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून ६ किलो ९९४ ग्रॅम वजनाचा अफू व डोडा चुरा, एक मोबाईल फोन, तसेच चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. आरोपी हा अंमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने हा माल बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

चौकशीदरम्यान आरोपीने हा अंमली पदार्थ राजस्थानमधील नागौर परिसरातील एका व्यक्तीकडून आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असून अंमली पदार्थ पुरवठा साखळीचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group