पिंपरी (Pclive7.com):- संभाजीनगर-शाहूनगर भागात दरवर्षी गुढीपाडवा हिंदू नववर्षांनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते. परंतु मागील दोन वर्ष कोरोना निर्बंध असल्याने शोभायात्रा रद्द करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने सर्व निर्बंध हटवले आहे. त्यामुळे यावर्षी दोन वर्षानंतर भव्य दिव्य शोभायात्रा असणार आहे. तरी फुलेनगर, संभाजीनगर, शाहूनगर, शिवतेजनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शोभयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

शोभयात्रेचा मार्ग :-
श्री गणेश मंदिर महात्मा फुले नगर, श्री तुळजाभवानी मंदिर संभाजीनगर, श्री रामेश्वर मंदिर संभाजीनगर, श्री दत्त मंदिर संभाजीनगर, श्री स्वयंभु गणपती मंदिर संभाजीनगर, श्री सिद्धिविनायक मंदिर लिंक रोड सावरकर पथ संभाजीनगर, बंधन स्वीट शाहूनगर, शिवशंभो फाउंडेशन चौक शाहूनगर, महाबली मंदिर शाहूनगर मार्गे, शेवट श्री महालक्ष्मी मंदिर शाहूनगर
विशेष आकर्षण-
▪️मर्दानी खेळ
▪️ढोल पथक
▪️विद्युत रोषणाई
तरी परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मंगलमय पोशाखात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group