पिंपरी (Pclive7.com):- विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने राष्ट्रधर्म जागविणाऱ्यासाठी भक्ती-शक्ती ११ मारुती परिक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्रमेत सहभागी होण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील ५० पेक्षा अधिक तर पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून ७५० दुचाकीसह १५०० कार्यकर्त्यांचा असणार सहभाग यात असणार आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220324-WA0025-300x300.jpg)
विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांतवतीने श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या भक्ती शक्ती ११ मारुती परिक्रमा करण्यात येणार आहे. दिनांक ८, ९, १० एप्रिल या तीन दिवसात ही परिक्रमा होणार आहे. सज्जनगडावरील मारुतीच्या मंदिरापासून परिक्रमेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती, विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क समितीचे संपर्कप्रमुख मनोहर ओक यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील तरूणाईने अकरा मारुती मंदिरांचे दर्शन घेऊन समाजात राष्ट्रधर्म जागर करण्यासाठी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील १५०० पेक्षा अधिक कार्यकर्ते ११ मारुतीच्या दर्शनासाठी निघणार आहेत. रविवार दिनांक १० एप्रिल रोजी बत्तीस शिराळा मारुतीचे दर्शन होईल व यात्रेचा समारोप होईल.
तरुणांना शक्तीची उपासना करण्याचा मंत्र देण्यासाठी हनुमानाचे चरित्र उपयुक्त ठरेल म्हणून समर्थांनी ११ मारुतीची स्थापना केली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात ही ११ शक्तिस्थाने निर्माण झाली.
परिक्रमेसाठी विनामूल्य प्रवेश असून स्वतःची दुचाकी घेऊन परिक्रमेत सहभागी होता येणार आहे. भोजनाचा खर्च विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी परिक्रमेत अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने करण्यात आले आहे.
अकरा मारुती भक्ती शक्ती परिक्रमा यात्रा सज्जनगड ते बत्तीस शिराळा अशी मोटासायकल परिक्रमा संपन्न होणार आहे. दि. ८ एप्रिल रोजी सज्जनगड येथे रात्री परिक्रमेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण व मुक्काम होईल. दि. ९ एप्रिल रोजी सज्जनगड येथून सुरू होईल. पहिल्या दिवशी १० मारुतीचे दर्शन होईल. पहिला मुक्काम पेठ नाका येथे होईल. दुसऱ्या दिवशी बत्तीस शिराळा मारुतीचे दर्शन होईल व यात्रेचा समारोप होईल अशी माहिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत भक्ती शक्ती ११ मारूती परिक्रमा आयोजकांनी दिली.