पुणे (Pclive7.com):- गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू,’ असा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. यावरुन ‘ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे,’ मत पुण्याचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केले होते. आता वसंत मोरे यांच्याकडून मनसे पुणे शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नगरसेवक वसंत मोरे यांचे पद काढून घेतल्याने त्यांच्या जागी आता नवनियुक्त पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष म्हणून साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे आदेश पालन न केल्याने वसंत मोरे यांच्याकडून पद काढून घेण्यात आल्याची चर्चा आहे.






















Join Our Whatsapp Group