पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील भोगवटाधारक प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या गृहसंकुलास महापालिकेमार्फत मुलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी माजी नगरसेविका माया बारणे यांनी केली आहे. बारणे यांनी यासंदर्भातील मागणीचे निवेदन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे झपाट्याने वाढणारे शहर आहे. या शहरामध्ये विविध ठिकाणी बांधकाम व्यवसायांकडून मोठ-मोठे गृहप्रकल्प उभारले जात असून ज्या बांधकाम व्यवसायिकांनी भोगवटाधारक प्रमाणपत्र प्राप्त करून सदर गृहप्रकल्प संबंधित रहिवाशांना हस्तांतरित केलेले आहे, अशा गृहसंकुलनामध्ये महापालिकेमार्फत कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिल्या जात नाहीत.
सदर गृहप्रकल्पामधील रहिवाशी कर भरत असून या करापासून महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढलेले आहे. ज्या बांधकाम व्यवसायिकांनी भोगवटाधारक प्रमाणपत्र प्राप्त करून सदर गृहप्रकल्प संबंधित रहिवांशांना हस्तांतरित केले आहे. अशा गृहप्रकल्पामध्ये महानगरपालिकेमार्फत पाणी-पुरवठा, विद्युत, ड्रेनेज, आरोग्यविषयक अशा मुलभूत सुविधा देण्यात याव्यात.
सदर गृहप्रकल्पातील रहिवासी दरमहिन्याला पाच ते दहा हजार रूपये मेन्टेनन्स सोसायटीकडे जमा करतात. जर त्यांना महानगरपालिकेच्या वतीने मुलभूत सुविधा पुरविल्या तर त्यांचा दर महिन्याला होणारा मेन्टेनन्स खर्च कमी होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळेल असे माया बारणे यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group