पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये हिंजवडी, वाकड, एमओबी, आर्थिक गुन्हे शाखा आणि शिरगाव पोलीस चौकीचा समावेश आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी (दि.१४) काढले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांची वाकड येथून हिंजवडी पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. तर नियंत्रण कक्ष आणि सध्या संलग्न शिरगाव पोलीस चौकीचे निरीक्षक सत्यवान माने यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड येथे, तर हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची एमओबी येथे बदली करण्यात आलेली आहे.
नियंत्रण कक्ष आणि एमओबी, पीसीबीचे मनोज खंडाळे यांची आर्थिक गुन्हे शाखा येथे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक वनिता धुमाळ/कदम यांची वरिष्ठ निरीक्षक शिरगाव पोलीस चौकी येथे बदली करण्यात आलेली आहे.


















Join Our Whatsapp Group