पिंपरी (Pclive7.com):- भारत सरकार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आयोजित स्मार्ट शहरे व स्मार्ट शहरीकरण या स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीने तीन बक्षिसे मिळविली आहेत. सुरत येथे ओपन डेटा विक, क्लायमेट चेंज आणि प्लेस मेकिंग या तीन विविध पुरस्कारांनी सन्मानित केले.

सुरत येथे १८ ते १९ एप्रिलला स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण परिषद सुरू आहे. मध्ये पिंपरी चिंचवड केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील व सहमुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण व कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी पुरस्कार स्वीकारला.

देशातील ६२ शहरांमधून झाली निवड
# स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ओपन डेटा वीक हा उपक्रम आयोजित केला. या स्पर्धेत देशातील एकूण ६२ शहरांनी सहभाग नोंदविला. ५२ शहरांनी स्कोइपवर डेटासेट आणि डेटा स्टोरी अपलोड केल्या.
# ३८ शहरांनी डेटा डेचे आयोजन केले. शहरांनी स्कोड़पवर १३०० हून अधिक डेटासेट केल्या. डेटा डे इव्हेंटमध्ये सुमारे १० हजार जणांनी सहभाग घेतला. त्यातून पिंपरी-चिंचवडची निवड झाली.
# आयुक्त पाटील यांनी ‘ह्युमन स्क्रेलिंग द पब्लिक रियल्म या विषयावर मार्गदर्शन केले. बापूसाहेब गायकवाड यांनी पाथ-वे टू नेट झिरो या विषयावर मार्गदर्शन केले.

हे आहेत तीन पुरस्कार
ओपन डेटा वीक इव्हेंटमध्ये कामगिरी केली. प्लेस मेकिंग प्रकारात ७५ तासांत तयार केलेल्या सुदर्शन चौकातील ८ टू ८० पार्कला प्लेस मेकिंग मॅरेथॉन विजेता पुरस्काराने सन्मानित केले. ऊर्जा आणि हरित इमारती, शहरी नियोजन, हरित आवरण आणि जैवविविधता, गतिशिलता आणि हवेची गुणवत्ता, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन या पाच श्रेणींमध्ये ठरवून दिलेल्या २८ निकषांनुसार कामगिरी केल्यामुळे क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क २.० मध्ये ५ पैकी ४ स्टार मिळवून क्लायमेट चेंज पुरस्काराने सन्मानित केले.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १० शहरांची निवड केली आहे. यामध्ये, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीची ओपन डेटा वीक इव्हेंटमध्ये ‘सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांपैकी एक म्हणून निवड झाली. महापालिका व स्मार्ट सिटीने घेतलेल्या मेहनतीमुळे हा बहुमान मिळाला. – राजेश पाटील, आयुक्त
Tags: PCMCPimpri Chinchwad Smart CityRajesh PatilSmart Cityपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महापालिकाराजेश पाटीलस्मार्ट सिटीस्मार्ट सिटी पुरस्कार





















Join Our Whatsapp Group