पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव प्रभाग क्र.२१ मधील विविध भागातील विकासकामे प्रलंबित असून सदरची कामे होत नसल्याने माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती देताना वाघेरे म्हणारे कि, दि.१४ मार्च २०२२ पासून महापालिका स्थायी समिती, महासभेचे सर्व अधिकार राज्य शासनाने प्रशासकाला दिले आहे. महापालिकेचे प्रशासक म्हणून सर्वाना समान न्याय देणे, कामे वेगाने मार्गी लावणे, जलदगतीने निर्णय घेणे, नागरिकांचे प्रश्न, तक्रार अडचणी त्वरित सोडविणे याकरिता आपण योग्य ते निर्णय घेत आहात. परंतु आपण घेतलेल्या निर्णयावर प्रशासन अंमलबजावणी करित नसल्याचे दिसून येत आहेत.
प्रभाग क्र.२१ मधील तपोवन रस्त्यांचे डांबरीकरण करणे, पिंपरीगाव स्मशानभूमीचे नुतनीकरण करणे, पावर हाऊस चौक ते पिंपळे सौदागर पुलापर्यंत रस्तांचे कॉक्रिटीकरण करणे, आरक्षण क्रमांक १६६ येथे उद्यान विकसित करणे, आरक्षण क्र.१६२ येथे क्रिडा संकुल तयार करणे, आरक्षण क्र.१७३ येथे क्रिडा संकुल तयार करणे, इत्यादी कामांना स्थायी समितीकडून मंजूरी मिळून सील देखील झालेले आहे. परंतु यासर्व कामांना अद्यापदेखील कामाचे आदेश देण्यात आलेले नाही. तसेच प्रशासनाच्या गळथान कारभारामुळे दिवाळीपर्यंत या कामांना कामाचे आदेश मिळतील अशी शास्वती देखील वाटत नाही. प्रशासनाने अडवलेल्या या विकासकामांना हॅण्ङब्रेक लागला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचे आपले स्वप्न हवेतच विरणार आहे का ? असा प्रश्न नागरीकासमोर उभा राहिला आहे.
तरी आपण सदर विकासकामांना गती देण्यासाठी कामाचे आदेश देण्याचे निर्देश संबधित विभागास त्वरित द्यावेत अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group