पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २०, फुलेनगर येथे महानगरपालिके मार्फत थेट नळाला लावलेल्या एकूण १९ विद्युत मोटर्स जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह बीट निरीक्षक राजदीप तायडे, मीटर निरिक्षक हटकर, प्लंबर श्री.वारे आणि श्री.भाईप, तसेच राज्य राखीव सुरक्षा बल याचे २२ कर्मचारी, मनपाचे २ फिटर, ६ मजूर, २ वायरमन, १ अतिक्रमण वाहनासह चालक अशा एकूण ३० जणांच्या पथकाने केली.
‘ह’ प्रभागाचे उपअभियंता प्रकाश सगर आणि चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता शाम गर्जे, दिग्विजय पवार, सन्मान भोसले यांच्या पथकाने सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group