पिंपरी (Pclive7.com):- समाजातील सामाजिक ऐक्य, सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी कुदळवाडी येथे माजी स्विकृत सदस्य दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार महेश लांडगे (भोसरी विधानसभा) यांचे बंधू कार्तिक लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिनेश लालचंद यादव यांचे जनसंपर्क कार्यालय कुदळवाडी बीआरटी रस्ता या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिम धर्मातील पवित्र सण रमजान ईद निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सरचिटणीस स्वी सदस्य दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने भोसरी येथे रोजा इफ्तार” पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चिखली परिसरातील सर्व नगरसेवक, चिखली पोलिस ठाण्यात सर्व अधिकारी व चिखली कुदळवाडी परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला.
गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ पार पडत असलेल्या या उपक्रमामध्ये धर्माच्या बंधना पलीकडे जाऊन सामाजिक एकोपा जपणाऱ्या या सर्व समाज बांधवांचे जाहीर आभार दिनेश यादव यांनी व्यक्त केले.





















Join Our Whatsapp Group