पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी, पुणे येथील नामांकित डॉ.डी वाय पाटील इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च या महाविद्यालयाला केंद्रीय शिक्षण मंत्रालायाकडून ‘थ्री स्टार’ मानांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाच्या इनोव्हेशन आणि इंक्युबेशन सेलच्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन काउन्सिल अन्तर्गत हे मानांकन देण्यात आले.

या नांमाकनसाठी संपूर्ण देशातून महाविद्यालये सहभाग घेतला होता. या नामांकनासाठी महाविद्यालयाच्या इनोव्हेशन आणि इंक्युबेशन सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थी व प्राध्यापक यांनी संशोधनाची सवय अंगिकृता करावी यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची दखल घेतली जाते.
या नामांकनासाठी महाविद्यालयाच्या इंक्युबेशन सेलच्याप्रमुख डॉ. वंदना पाटील, इनोव्हेशन आणि आणि या अंतर्गत येणार्या सर्व प्राध्यापक सदस्य, सर्व विभागप्रमुख यांनी परिश्रम घेतले. नामांकनाच्या यशासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. अनुपमा पाटील व सर्व विभागप्रमुख तसेच कुलसचिव श्री वाय के पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मिळालेल्या नामांकनाबद्दल डॉ.डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. नीरज व्यवहारे, डी.वाय.प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. तेजस एस. पाटील संस्थेचे चेअरमन व राज्यमंत्री श्री. सतेज डी. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
Tags: आकुर्डीडॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयथ्री स्टारपिंपरी चिंचवडमानांकन






















Join Our Whatsapp Group