पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अद्यावत संकेतस्थळाचे (www.pcmcindia.gov.in) अनावरण आज महापौर नितीन काळजे यांचे हस्ते झाले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, राजेंद्र गावडे, नितीन लांडगे, संदीप वाघेरे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे www.pcmcindia.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत असून त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन नव्याने विविध सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक बदल करणेत आलेले आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळास प्रतिमहीना सरासरी दीड ते दोन लाख नागरिक भेट देतात. संकेतस्थळ ठराविक कालावधीनंतर विविध सुविधांयुक्त नाविन्यपुर्ण स्वरूपात नागरिकांपुढे आणण्याचा महानगरपालिकेचा सतत प्रयत्न असतो. त्यास अनुसरून महानगरपालिकेने नवीन स्वरूपातील संकेतस्थळ विकसित केलेले आहे. नवीन संकेतस्थळामध्ये आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणेत आलेला आहे. जेणेकरुन अधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नव्याने विकसित झालेली संगणक यंत्रणा, टॅबलेट व मोबाईल फोन इत्यादीसाठी वापरणेत येणारे वेब ब्राउजरसाठी सदरचे संकेतस्थळ पूर्णत: सुसंगत असणार आहे.
शहरातील नागरिक महानगरपालिकेकडे विविध समस्यांसाठी विविध माध्यमांद्वारे तक्रारी दाखल करतात. संबंधित विभागाकडून तक्रारीचे निराकरण झाल्यावर ऑनलाईन तक्रार क्लोज केली जाते. मात्र ज्या तक्रारींच्या कार्यवाहीबाबत नागरिकांचे समाधान झालेले नाही अशी तक्रार नागरिकांना स्वत:चे लॉगीनद्वारे ऑनलाईन रि-ओपन करता येणार आहे. तसेच क्लोज केलेल्या तक्रारीबाबत स्वत:चा अभिप्राय (Feedback) नोंदविता येणार आहे.
नवीन संकेतस्थळामध्ये करणेत आलेल्या बदलामुळे टॅबलेट व मोबाईलधारक यांना संकेतस्थळ वापरण्यास सुसह्य होणार आहे. त्याकरीता संकेतस्थळ Responsive Pages च्या स्वरूपात सादर करणेत आलेले आहे.
या संकेतस्थळाचे अद्यावतीकरण करण्याचे कामकाज मुख्य माहिती व तंञज्ञान अधिकारी निळकंठ पोमण व सुधीर बोराडे, दिमाख सहस्त्रबुद्धे यांनी केले आहे
पिंपरी महापालिकेच्या अद्यावत संकेतस्थळाचे अनावरण






















Join Our Whatsapp Group