पिंपरी (Pclive7.com):- 2021-22 यावर्षाचा एसएससीचा निकाल काल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही युनिक व्हीजन इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल 100% लागल्यामुळे शाळेत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. स्व. श्री गजानन चिंचवडे सरांनी स्थापन केलेली हि शाळा आज उत्तम विद्यार्थी घडवीत आहे. स्व. श्री गजानन चिंचवडे सरांचे स्वप्न साकारण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मनापासून प्रयत्न करत आहेत.

युनिक व्हीजन इंग्लिश मिडियम स्कूलने दरवर्षीप्रमाणे यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. साक्षी वाघमोडे ही 94.4% गुण मिळवून शाळेत पहिली आली. श्रुती इट्टम व दिव्यांशु चौहान हे दोघे 91.4 % गुण मिळवून दुसरे आले.

नगरसेविका आणि शाळेच्या संचालिका आश्विनीताई चिंचवडे यांनी पेढे व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रजनी दुवेदी, वर्गशिक्षिका सौ. मनिषा बलकवडे तसेच इतर शिक्षिकांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.






















Join Our Whatsapp Group