पिंपरी (Pclive7.com):- मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून पुरुषांच्या वतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्यानंतर संस्थेच्या वतीने पिंगळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी परीसरातील महीलां वटवृक्षाला सूत बांधतात, आंबेचा नैवेद्य, जीफुले, जांभूळ, पान सुपारी, हळकुंड, गहू वाहतात.

पावसाळी दिवस असल्याने आंबे सडतात. त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरते. आणि सूतामध्ये माती जाऊन बसते. त्यामुळे झाडांना किडही लागते व परीसरात रोगराई पसरते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नागरिक आजारी पडतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी झाडांना बांधलेले सूत एक टेम्पो भरुन कापुन काढले व तीन पोते निर्माल्य काढले, त्याचे योग्य त्या ठिकाणी विर्सजन केले. आम्ही गेल्या सात वर्षांपासून आम्ही सुत काढण्याचे काम करत असल्याचे शहाराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात अनेकांना आपला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. त्यामुळे आम्ही नम्रपणे आव्हान करतो कि, जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरण दिनीच वृक्ष लागवड न करता वर्षभर आपापल्या वेळेप्रमाणे वृक्षाची लागवड करून कुटुंबाप्रमाणे संगोपन करावे झाडांची निगा राखावी आजचे वृक्षरोपन म्हणजे पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन सोय असे जोगदड म्हणाले. यावेळी आण्णा जोगदंड यांनी पर्यावरणाचा संदेश देणारा शर्ट घातला होता.
एक झाड दिवसाला 230 लिटर ऑक्सिजन देते. आपल्याला 550 लिटर ऑक्सिजनची दिवसाला गरज भासते. वृक्षतोडीमुळे 21%ऑक्सिजन गायब झाला आहे. याचे परिणाम पुढच्या पिढीला निश्चित भोगावे लागतील. इन्व्हेरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स ने केलेल्या सर्व्हमध्ये जगात भारतातचा पर्यावरण बाबतीत 180 वा सर्वात खालचा नंबर आहे, म्हणजे किती उदासीनता आपल्या देशात आहे याचे गांभीर्य ओळखून प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून वटवृक्षाची हानी होऊ नये म्हणून त्याला बांधलेले सुत काढतो असे जोगदंड म्हणाले.






















Join Our Whatsapp Group