पिंपरी (Pclive7.com):- नुकतेच लागलेले दहावीचे रिझल्ट आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेली ११ वी ऑनलाईन एडमिशन प्रक्रिया ह्या मुळे सर्व पालक आणि विद्यार्थी योग्य शाखा निवडून यशस्वी करिअर निवडण्याच्या प्रयत्नात व्यग्र आहेत. अपुरी आणि मर्यादित माहिती ह्या मुख्य अडथळ्यामुळे सर्वसाधाणपणे सायन्स, आर्टस आणि कॉमर्स ह्या तीन पारंपरिक शाखांकडे भरपूर विद्यार्थ्यांचा ओढा असतो. पण ह्या रूढ अभ्यासक्रमांबरोबरच, व्यवसाय आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे.
अशीच एक उद्योगप्रधान आणि कौशल्य विकासावर भर देणारी महाराष्ट्र बोर्डाची Higher Secondary Vocational Courses (HSVC) ही शाखा. ह्या शाखेतील फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम पंचतारांकित करिअरच्या अनेक संधीची कवाड खुली करत आहे. ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत HSVC हा चौथा पर्याय निवडून फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम निश्चित करावा. १२ वी पूर्ण झाल्यावर लगेचच स्वतःचा व्यवसाय सुरु करणे सहज शक्य आहे. तसेच हा अभ्यासक्रम महाराष्ट्र शिक्षण मंडळ राबवत असल्यामुळे १२ वी नंतर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मधील शिक्षणाच्या पुढील संधीही उपलब्ध करून देतो.
प्रात्यक्षिक अभ्यासक्रम, सहज आणि सोपे विषय आणि मर्यादित स्पर्धा असा हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणे अगदी सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांनाही सहज शक्य आहे. देश विदेशातील पंचतारांकित करिअरच्या संधी, उत्तम मोबदला देणारा स्वतःचा व्यवसाय, फ्लाईट किचन, इंडस्ट्रिअल किचन, क्रुझ लाईन, फास्ट फूड आउटलेट, आणि फाईन डायनिंग स्पेशालीटी रेस्टॉरंट अश्या अनेक करिअर संधितून विद्यार्थी आपले उज्वल भविष्य घडवू शकतात. पर्यटन, खाद्य संस्कृती, विविध कारणास्तव वाढत जाणारी पर्यटकांची संख्या ह्या सारख्या पायाभूत घटकावर आधारलेले हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत असल्यामुळे कायमच कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे.
नोव्हेल व्होकेशनल ज्युनिअर कॉलेज, ११ वी १२ इन हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम गेली अनेक वर्ष यशस्वीरीत्या राबवत आहे. सुसज्ज प्रात्यक्षिक कक्ष, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहर्निश कार्यरत असणाऱ्या शिक्षक वृंद, नामांकित हॉटेल्स बरोबरील टाय अप्स, ह्या सर्व घटकांमुळे अनेक गुणवंत विद्यार्थी स्वतःचे यशस्वी करिअर घडवत आहेत.
अजूनही संधी गेली नाही. आपला पुढील शैक्षणिक प्रवास सुनिश्चित करण्याआधी हॉटेल मॅनेजमेंट ह्या आश्वासक करिअर निर्माण करून देणाऱ्या पर्यायाची माहिती अवश्य करून घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
नोव्हेल्स एनआयबीआर कॉलेज आॕफ हॉटेल मॕनेजमेंट, निगडी – पुणे
९८८१५४००६६/९८८१५२००६६
Click below link
to know more
Website : www.nibrindia.com