पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटना भोसरी विधान सभेचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, विभागअध्यक्ष अंकुश तापकीर यांच्या नेतृत्वात अतिशय उत्साहात साधुराम गार्डन, भोसरी-मोशी रोड, मोशी या ठिकाणी संपन्न झाला. पावसाच्या तडाख्यात देखील कार्यालय तुडुंब भरले होते. अतिशय उत्साहात महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मनसेचे नेते राजेंद्र (बाबू) वागस्कर (नेते, महाराष्ट्र राज्य), किशोर (भाऊ) शिंदे (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य), गणेश (आप्पा) सातपुते (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरसंघटक पदी स्वप्नील भोसले (मोशी), जयसिंग भाट (जाधववाडी-मोशी), दत्तात्रय होणकळस (दिघी) यांची नियुक्ती करण्यात आली.
त्याप्रसंगी मनसे उपशहराध्यक्ष चंद्रकांत (बाळा) दानवले, राजू सावळे, शहर सचिव रुपेश पटेकर, पिंपरी विभागअध्यक्ष दत्ता देवतरासे, मनसे महिला सेना शहराध्यक्ष अश्विनी बांगर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहर सचिव सीमा बेलापूरकर, उपशहराध्यक्ष संगीता देशमुख, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, विभाग अध्यक्ष सुजाता काटे, वाहतूक सेना शहराध्यक्ष सुशांत साळवी, शारीरिक सेना शहराध्यक्ष महावीर कर्णावत, विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष अनिकेत प्रभू, विभागअध्यक्ष प्रतीक शिंदे, शहर संघटिका श्रद्धा देशमुख, वाहतूक सेना उपशहराध्यक्ष नितीन सूर्यवंशी, सचिव शिवकुमार लोखंडे तसेच सर्व उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags: कार्यकर्ता मेळावापदाधिकारी मेळावापिंपरी चिंचवड मनसेभोसरी विधानसभामनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासचिन चिखले