पिंपरी (Pclive7.com):- मीडिया स्पेस इनकॉर्पोरेशनच्या वतीने औद्योगिक साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. प्रकाश दिवाकरन यांना ‘लीडरशिप एक्सलन्स ॲवॉर्ड-२२’ हा पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते हा पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
पदवीप्रदान कार्यक्रमात प्रकाश दिवाकरन यांना तमिळनाडू मधील मदुराई कामराज युनिव्हर्सिटीच्या वतीने पीएचडी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. दिवाकरन यांचा तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री तिरु एल मुरुगन, कुलगुरू डॉ.जे. कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. चिंचवड- शाहू नगर येथील विद्या तिलक इंस्टीट्यूटचे डॉ. प्रकाश दिवाकरन संचालक आहे.