पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील सर्व्हेअरला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज (०३) दुपारी अडीचच्या सुमारास झाली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

संदीप लबडे असे लाच मागणाऱ्या सर्व्हेअरचे नाव आहे. लबडे याने एकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. महापालिकेच्या नगररचना विभागात यापूर्वीही लाचलुचपत विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात संदीप लबडे हे सर्व्हेअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एकाकडे २ लाखांपेक्षा अधिक लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती. मात्र, बुधवारी दुपारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लबडे याला ताब्यात घेतले आहे.

संदीप लबडे याने कोणत्या प्रकरणात लाच मागितली होती, याची अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र, या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या सर्व्हेअरकडे महापालिकेतील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलख ही गावे आहेत. या प्रकरणामुळे मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत. एसीबीने ताब्यात घेतलेल्या सर्व्हेअरची चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे





















Join Our Whatsapp Group