पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे आज (दि.१३) पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. मनसेच्या महासंपर्क अभियान अंतर्गत शहरातील विविध भागात रॅली तसेच दुपारी ३ वाजता आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील केरला भवन येथे महाविद्यालयीन तरूण-तरूणींशी ते थेट संवाद साधणार असल्याची माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी दिली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा आजचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. ठाकरे सध्या राज्यातील विविध भागात जाऊन तरूणांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अमित ठाकरे पहिल्यांदाच तरूणांच्या भेटीला येत आहेत. त्याकरिता मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. हेमंत डांगे यांच्यासह सर्व टीमने शहरातील प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अमित ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्याबाबतची माहिती दिली आहे.
अमित ठाकरे यांचे पिंपरी-चिंचवड शहरात आज दि.१३ रोजी दुपारी २.३० वाजता सांगवी येथे आगमन होणार आहे. त्यानंतर सांगवी फाट्यापासून रॅलीला सुरुवात होईल. सांगवी-रक्षक चौक-काळेवाडी फाटा-१६नंबर-डांगे चौक अशा मार्गाने डांगे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून पुढे पुन्हा रॅलीला सुरुवात होईल. डांगे चौक-थेरगाव फाटा-थेरगाव गावठाण-एम एम कॉलेज – चित्तराव गणपती रोड मार्गे- केशवनगर शाळा अशा मार्गाने विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे यांच्या चिंचवडगाव येथील निवासस्थानी ते भेट देतील.
त्यानंतर पुन्हा रॅलीला सुरुवात होईल. चिंचवडगाव-जुना जकात नाका-स्पाईन रोड-बिजलीनगर पुल-गुरुद्वारा रोड मार्गे-धर्मराज चौक- आकुर्डी रेल्वे स्टेशन – केरलाभवन येथे रॅलीचा समारोप होईल. केरला भवन निगडी प्राधिकरण येथे महाविद्यालयीन तरुण तरुणी व पदाधिकारी यांच्याशी अमित ठाकरे यांचा थेट संवाद होईल.
Tags: Amit ThackerayAmit ThakreyHemant DangeMahasampark AbhiyanMnsPimpri Chinchwad Mnssachin chikhale






















Join Our Whatsapp Group