पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या भगवंत बाबुराव पवार (वय वर्ष ९५) यांच्या चार पिढ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात “घर घर तिरंगा” या अभियाना अंतर्गत उत्स्फूर्तपणे झेंडावंदन केले.

भगवंत पवार यांचे सुपुत्र प्रमोद भगवंत पवार (वय ६७ वर्ष), मानस प्रमोद पवार (वय ३९ वर्ष), छोटा रिधान मानस पवार (दीड वर्ष) कु.आराध्या देवेंद्र पवार (वय ८ वर्ष) यांनी भारताचे सर्वस्व असलेल्या तिरंग्याला सलामी दिली.

पंजोबा भगवंत पवार यांनी आपल्या मुलाला, नातवाला आणि पणतूंना देश स्वातंत्र्याच्या आठवणी सांगितल्या. वंदे मातरम् घोष केला. पिंपळे गुरव परिसरात या चार पिढ्यांच्या झेंडावंदनाची, देशप्रेमाची चर्चा आहे.





















Join Our Whatsapp Group