पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी या सोसायटीला रहिवाशी विभागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय शहर विकास मंत्रालयामार्फत करण्यात आले. केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री सुरेंद्रजीत अहलुवालिया यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे नेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे आणि रोझलँड रेसिडेन्सीचे चेअरमन संतोष मसकर यांनी पुरस्कार स्विकारला.
यावेळी आनंद दप्तरदार, सिद्धार्थ नाईक, अभय कुलकर्णी, रोहन रानडे, बांधकाम व्यासायिक विनोदशेठ चांदवाणी,रोझलँड रेसिडेन्सीचे मॅनेजर प्रल्हाद नायकिंदे, निलेश जगताप आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group