पुणे (प्रतिनिधी):- देशात अनेक वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविले जाते. मात्र, भाजप सरकारच्या काळात या अभियानाच्या जाहिरातींवर करोडो रूपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारच्या या उपक्रमाच्या खर्चाच्या तपासणीची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छतेची वारी’ हा उपक्रम पार पडला. यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. कात्रज ते अभिनव चौक या २ किमी अंतराच्या रस्त्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार सुळे यांनी, एलफिन्स्टन दुर्घटना आणि बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावरुन सरकारला धारेवर धरले. विकासाला आपला विरोध नसून मुलभूत सुविधांची पुर्तता आधी करायला हवी. जनतेला आधी वरणभात नीट द्या नंतर पुरणपोळीचे (बुलेट ट्रेन) बघा असा टोला त्यांनी सरकारला लगावला.






















Join Our Whatsapp Group