पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘ब’ आणि ‘क’ अशा १६ संवर्गातील ३८६ पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातून १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले होते. तब्बल १ लाख ३० हजार ४७० जणांनी ऑनलाइन अर्ज आले आहेत.

महापालिकेतील रिक्त जागांसाठी अर्ज केलेल्या ८४ हजार ८४७ जणांनी एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरले आहे. ४५ हजार ६२३ जणांनी अद्याप परीक्षा शुल्क भरलेले नाही. शुल्क भरण्यासाठी सोमवारपर्यंत (दि.२६) मुदत दिली आहे. या जागांसाठी खासगी कंपनीमार्फत लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातील गुणानुक्रमे पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय यादी ठरणार आहे. त्यामुळे तरुणांना थेट महापालिका सेवेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
अतिरिक्त कायदा सल्लागार, कायदा अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक वृक्ष (प्रत्येकी १ जागा), सहायक उद्यान अधीक्षक, न्यायालयीन लिपिक व प्राणी रक्षक (प्रत्येकी २ जागा), हॉर्टिकल्चर सुपरवायझर (जागा ८), समाजसेवक (जागा ३), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (जागा ४१), लिपिक (जागा २१३), आरोग्य निरीक्षक (जागा १३), उद्यान निरीक्षक (जागा ४), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (जागा ७५), कनिष्ठ अभियंता विद्युत (जागा १८) अशा ३८६ जागा भरल्या जाणार आहेत.





















Join Our Whatsapp Group