पिंपरी (Pclive7.com):- अग्रवाल समाज फेडरेशन पुणे यांच्या वतीने उद्या सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी आगरवाल समाजाचे आराध्यदैवत राजाधिराज श्री अग्रसेन जयंती निमित्त भव्य दिव्य राज दरबार आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

हि शोभायात्रा दापोडी येथून प्रारंभ होईल. पिंपरी- श्री अग्रसेन भवन चिंचवड – श्री अग्रसेन प्रतिमा – श्री अग्रसेन महाराज गार्डन निगडी – भोसरी अग्रकुल धाम, विश्रांतवाडी या मार्गे येरवड़ा, नगर रोड वड़गांव शेरी, दत्तवाडी स्कूल, महालक्ष्मी मंदिर स्वारगेट – खड़की अग्रवाल समाज धर्मशाळा येथे शोभायात्रा समाप्त होईल.अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बंसल, सचिव सीए के एल बंसल, खजिनदार श्याम गोयल, सांस्कृतिक प्रमुख सुधीरकुमार आगरवाल आदींनी पुढाकार घेतला आहे. या शोभायात्रेमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने आणि हजारो आगरवाल समाज बांधव सहभागी होणार आहे.
या संदर्भात माहिती देताना अग्रवाल समाज फेडरेशन पुणेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, ही मिरवणूक जगात स्वतःहून वेगळी असेल. यामध्ये अग्रवाल समाजातील १८ गोत्र राजे-मंत्र्यांसह ऋषी-मुनी आणि राज्यातील दरबारी व प्रजा जनांची भव्य झलक दाखवण्यात येईल. ही भूमिका अग्रवाल समाजातीलच विविध मान्यवर पार पाडतील. श्री गोयल यांनी समाजातील ज्या नागरिकांना यामध्ये भूमिका करायची आहे. त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले.





















Join Our Whatsapp Group