जामा मस्जिद फुगेवाडी येथे आमदार स्थानिक विकास निधीतून सीसी टीव्ही बसविण्याचे काम पूर्ण
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा क्षेत्रात शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, धार्मिक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी आमदार अण्णा बनसोडे नेहमीच प्रयत्न करत असतात. शहराला प्रगती पथावर घेऊन जाताना शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षितता असावी शहरात शांतता व सलोखा निर्माण व्हावा हा आमदार अण्णा बनसोडे यांचा प्रामाणिक हेतू असतो. त्याचाच एक भाग म्हणजे शैक्षणिक संस्था व धार्मिक संस्थेच्या ठिकाणी वॉल कंपाउंड बांधणे, बसविण्याचे काम ते करत असतात.
त्याच उद्देशाने आज जामा मस्जिद फुगेवाडी येथे आमदार अण्णा बनसोडे यांच्या स्थानिक विकास निधीतून CCTV बसविण्याचे काम पूर्ण झाले. त्याचे उदघाटन कार्यसम्राट आमदार अण्णा बनसोडे यांच्याच हस्ते करण्यात आले. CCTV मुळे फुगेवाडी जामा मस्जिद च्या परिसरात सुरक्षित वातावरण निर्मिती होईल. त्यामुळे तिथे प्रार्थनेसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये तसेच मदरसामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्हता तयार होईल असा विश्वास जामा मस्जिद फुगेवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मुस्लिम समाजातील कोणतीही अडचण आली तर सर्वात प्रथम आमदार अण्णा बनसोडे धावून येतात व प्राधान्याने त्या समस्यांचे निराकरण करतात. यासाठी संपूर्ण मुस्लिम समाजाचे वतीने आमदार अण्णा बनसोडे साहेबांचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया जामा मस्जिद चे अध्यक्ष बादशहा भाई शेख यांनी वक्त केली.
आजच्या या CCTV उदघाटन प्रसंगी माजी नगरसेवक अबंरनाथ मेहमुदभाई सय्यद, श्रीमती.संध्याताई गायकवाड, नगरसेविका सौ.स्वाती (माई) काटे, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष संजय औसरमल, सामाजिक कार्यकर्ते सतिश लांडगे, प्रा. मनोज वाखारे, लतिफ सय्यद, संजय गरूड, दीपक शिंदे, हरेश पुजारी यांच्या समवेत जामा मस्जिदचे पदाधिकारी त्यामध्ये अध्यक्ष बादशाहभाई शेख, सेक्रटरी इसाकभाई शेख, मुनाफ गुंदगी, कासीम शेख, महंमद शेख, यासीन सारवान, खलिल शेख उपास्थित होते.


















Join Our Whatsapp Group