पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील १८ वर्षाखालील ४० मुला-मुलींना दिवाळी सणानिमित्त मुलांच्या मनपसंतीनुसार थेरगाव येथील महाराजा क्लॉथ स्टोअर्स मधुन कपडे, खाऊ, व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आले.

यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता. तसेच आकुर्डी येथील वृद्ध आनंद आश्रमातील अनाथांना ४० ब्लँकेट आणि मनोरंजनासाठी एलईडी टीव्ही संच खरेदी करून देण्यात आला.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, श्री.फाउंडेशनचे संस्थापक सागर पाडाळे, शेकाप पुणे अध्यक्ष नितीन बनसोडे, ओम अनिल पाडाळे, रविना साबळे, सुप्रिया पाडाळे आदी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group