पिंपरी (Pclive7.com):- मुख्य जलवाहिनीला उपवाहिन्या जोडणीचे काम करण्यात येणार आहे. पाईप जोडणीचे काम अंदाजे सायंकाळी 7 पर्यंत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या क, इ आणि फ प्रभागातील मोशी, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, डूडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर 12 यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात उद्या शुक्रवार आणि शनिवारीचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि भविष्यातील शहराची लोकसंख्या विचारात घेता शहरामध्ये नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून मुख्य जलवाहिनीला उपवाहिन्या जोडणीचे काम करण्यात येणार आहे. पाईप जोडणीचे काम अंदाजे सायंकाळी 7 पर्यंत संपण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महापालिकेच्या क, इ आणि फ प्रभागातील मोशी, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, डूडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर 12 यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर रात्रीचा व दुसऱ्या दिवशी सकाळचा पाणीपुरवठा उशिरा, कमी दाबाने व विस्कळीत राहील. नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
Tags: Jadhavwadilatest marathi newsMoshino water supplyPcmc Marathi NewsPcmc newsPcmc waterPcmc Water SupplyTop Marathi News





















Join Our Whatsapp Group