पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेतर्फे काकड आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभर चाललेल्या सोहळ्या मध्ये रोज पहाटे ४.३० ते ६.३० काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी काकड आरती सांगता समारंभ संपन्न झाला.

काकड आरती सांगता समारंभादिवशी सायंकाळी ५ ते ६ पर्यंत गावात मुख्य रस्त्यावरून दिंडी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत रामायणाचार्य ह.भ.प. महावीर महाराज सूर्यवंशी (पुनावळे) यांचे काल्याचे हरीकीर्तनाने काकड आरती सांगता समारंभ संपन्न झाला.
यावेळी रामायणाचार्य हभप. महावीर महाराज सूर्यवंशी (पुनावळे) यांचा सन्मान माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच भाविकांना महाप्रसादाचे भोजन देण्यात आले. परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काकड आरती आयोजन श्री.विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे, संस्थेचे अध्यक्ष हभप.गणेश साहेबराव काटे, उपाध्यक्ष दत्तात्रय नारायण काटे, खजिनदार भरत लक्ष्मण काटे, सेक्रेटरी विलास महादू काटे, कार्याध्यक्ष शंकर गुलाब चोंधे, शेखर सुखदेव काटे, हभप.विलास बाबुराव काटे, शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष संपत मेटे, शिवशंभो सेवा मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर हांडे तसेच आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group