
विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालवल्याचे वृत्तही समोर आले होते. बुधवारी रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालवत गेली आणि उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र सरकारच्या माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भातील ट्वीट रात्री १२ वाजून ८ मिनिटांनी करण्यात आलं आहे.
























Join Our Whatsapp Group