पिंपरी (प्रतिनिधी):- दिवाळी सण सुरू झाला आहे. नवीन कपडे, फराळाचे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सगळ्यांच्याच आयुष्यात हा उत्साह असतो असे नाही. त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जपत साद सोशल फाउंडेशच्या वतीने अंध कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, साद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद, सुधीर चौगुले, सुहास भोसले, अरविंद सोलंकी, अभि इम्पॅक्ट लॉजिस्टिकचे जितेंद्र जोशी, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे, कृष्णा कन्स्ट्रक्शन कंपनीचे संजय सोलंकी, एक्सेन ग्रुपचे भीमसेन अगरवाल, तनिष्क ग्रुपचे दिलीप सोलंकी, सिल्वर ग्रुपचे संतोष बारणे, कृष्णा कन्स्ट्रक्शन कंपनीचे दुधाराम चौधरी, उद्योजक कुंदन ढाके, तनिष्क ग्रुपचे राजेश मेहता, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शामराव अहिरराव, एच.एन. देशमुख, रमेश चौधरी, साद सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव राहुल कोल्हटकर, प्रवीण जाधव, नितीन धोत्रे, प्रमोद शेलार, अमित जैन, डॉ. अरविंद खरात, जितेंद्र जैन,राकेश मेहता, किसन बावकर, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल कातळे आदी उपस्थित होते.
साद सोशल फाउंडेशन नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. गेल्या तीन वर्षापासून साद फाउंडेशनतर्फे फराळाचे वाटप करण्यात येत आहे. यंदा महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या फराळाच्या पदार्थांचे अंध कुटुंबाला वाटप करण्यात आले. चकली, चिवडा, कंरजी, शंकरपाळे, लाडू, असे विविध पदार्थ असलेली आठ किलोची पिशवी अंध बांधवांना देण्यात आली. फराळाचे साहित्य मिळाल्यानंतर अंध बांधवांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. तत्पूर्वी अंध बांधवांची गाण्याची मैफल झाली.
आपल्या प्रास्ताविकात बोलताना महेश शेटे म्हणाले की, देशात ३० लाख अंध व्यक्ती आहेत. आपल्या मृत्यूनंतर या डोळ्याची राख होते. त्याचा इतरांना काहीही उपयोग होत नाही. आपण प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प केला तर ३० लाख अंधांपैकी किमान १५ लाख अंध व्यक्ती हे जग आपल्या डोळ्यांनी पाहू शकतील.सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांनी सादच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
दरम्यान, यावेळी जीवनाचे अमूल्य वरदान नेत्रहीनला नेत्रदान, चला तर मग, निसर्गाची अदभूत किमया अंध बांधवानाही पाहता यावी. यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान करण्यासाठी आजच नेत्रदानाचा अर्ज भरुन संकल्प करण्याचे आवाहन केले. ३५ जणांनी नेत्रदानाचा फॉर्म भरून मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
प्रवीण जाधव, परेश मोरे, राहुल कोल्हटकर, रोशन मोरे, अनिल दळवी यांनी संयोजनात पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव कचरे यांनी केले तर आभार प्रवीण जाधव यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group