पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शितल काटे ह्या मैदानात उतरल्या आहेत.

नाना काटे यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज (दि.०८) पिंपळे सौदागर येथील पवनानगर, रहाटणी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेषत: जेष्ठ नागरिक व महिलांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना शितल काटे म्हणाल्या की, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात नाना काटे यांनी पिंपळे सौदागर-रहाटणी परिसराचा कायापालट केला आहे. राष्ट्रवादीने या परिसराचा केलेल्या विकासामुळे हे शहर आज देशपातळीवर ओळखले जाऊ लागले आहे. भविष्यात चिंचवड विधानसभेच्या सर्वांगिण विकासाकरिता या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांना प्रचंड बहुमताने निवडूण द्यावे असे आवाहन शितल काटे यांनी केले.
Tags: Chinchwad ElectionMaha vikas AaghadiMahavikas AaghadiNana katencpPimple saudagarRahataniSheetal Kate



















Join Our Whatsapp Group